क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज

sakal_logo
By

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य पुरस्कारासाठी अर्ज

मुंबई, ता. २७ : शिक्षण आणि त्याप्रति समर्पित सेवा करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. २०२२ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी ७ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
७ ऑगस्टपर्यंत केलेल्या अर्जावर संचालनालय स्तरावरील काम केले जाईल. त्यानंतर पुरस्कार निवड समिती आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून जिल्हास्तरावरून प्रत्यक्ष शाळांना भेटी दिल्या जातील. अर्ज केलेल्या शिक्षकांच्या जिल्हास्तरावरील मुलाखती घेऊन त्यासाठी पडताळणी करून संचालनालयाकडे शिफारस केली जाणार आहे. २४ ऑगस्ट रोजी निवड समितीने अंतिम शिफारस केलेल्या शिक्षकांच्या यादीसह माहिती सरकारकडे सादर केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07794 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..