मेट्रो-४ ला पाच मार्गिकांची जोडणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-४ ला पाच मार्गिकांची जोडणी
मेट्रो-४ ला पाच मार्गिकांची जोडणी

मेट्रो-४ ला पाच मार्गिकांची जोडणी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : वडाळा ते कासारवडवली या मेट्रो-४ आणि कासारवडवली ते गायमुख या मेट्रो-४ अ मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. ही मार्गिका ३५.२५ किलोमीटर लांबीची असून, एकूण ३२ स्थानके असणार आहेत. तसेच या दोन्ही मार्गिकांजवळ मुंबई महानगर प्रदेशातील इतर ५ मार्गिका जोडणार असल्याने मुंबई ते ठाणे प्रवास गतिमान होण्यासह लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ मार्गिकेचे काम २०१८ पासून सुरू केले आहे. एमएमआरडीएने केलेल्या नियोजनानुसार हा प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कोरोना टाळेबंदी आणि इतर कारणांनी या प्रकल्पाचे काम थंडावले होते. या मार्गिकेच्या ''पॅकेज ८, पॅकेज १० आणि पॅकेज १२ चे काम सुमारे आठ महिन्यांहून अधिक काळ बंद होते. सद्यस्थितीत या मार्गिकेच्या दोन पॅकेजची ५० टक्क्यांहून अधिकची कामे पूर्ण झाली असून, एकूण काम सुमारे ४० टक्के पूर्ण झाले आहे. काम संथगतीने सुरू असल्याने या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास २०२५ हे वर्ष उजाडण्याची शक्यता आहे.

प्रकल्प दृष्टिक्षेपात
- मेट्रो-४ मार्गिका ३२.३२ किलोमीटर लांबीची
- त्यावर एकूण ३२ स्थानके असणार
- या मार्गिकेचा गायमुखपर्यंत विस्तार करून मेट्रो-४ अ नामकरण
- ही मार्गिका २.६७ किलोमीटर लांबीची आहे.
- दोन्ही मार्गिकांची एकूण लांबी ३५.२५ किलोमीटर

या मेट्रो प्रकल्पांना जोडणी
मेट्रो मार्गिका ११ चे भक्ती पार्क स्थानक, मोनोरेल स्थानक, मेट्रो २ ब चे कुर्ला पूर्व द्रुतगती महामार्ग, मेट्रो ६ चे गांधी नगर स्थानक, मेट्रो ५ चे कापूरबावडी स्थानक, मेट्रो १० चे गायमुख स्थानक.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07829 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top