राज्यात बीए-५, बीए-२.७५चे ३६ रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बीए-५, बीए-२.७५चे ३६ रुग्ण
राज्यात बीए-५, बीए-२.७५चे ३६ रुग्ण

राज्यात बीए-५, बीए-२.७५चे ३६ रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बी. ए. ५ चे ४ रुग्ण आढळले आहेत. या शिवाय बी. ए. २.७५ व्हेरिएंटचेही ३२ रुग्ण आढळले आहेत. यातील २३ रुग्ण नागपूर येथील, ११ यवतमाळ आणि २ वाशिम येथील आहेत. या सर्व रुग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए. ४ आणि बीए. ५ रुग्णांची संख्या १९६ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या १२० झाली आहे.
बी. ए. ४ आणि ५ चे पुण्यात १०१ रुग्ण, मुंबईत ५१, ठाणे १६, रायगड ७, सांगली ५, नागपूर ८, पालघर ४, कोल्हापूरमध्ये २ रुग्ण सापडले; तर बी. ए. २.७५चे पुण्यात ५६, नागपूर ३३, यवतमाळ १२, मुंबई ५, अकोला ४, ठाणे ३, वाशिम २, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली आदी ठिकाणी प्रत्येकी १ रुग्ण सापडले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07830 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..