आज पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा
आज पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा

आज पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. ३१) राज्यभरात आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षेला एकूण ७ लाख २१ हजार ८‍६६ विद्यार्थी बसणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आज देण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत होती.

परीक्षा परिषदेमार्फत राज्यातील ३८ जिल्ह्यांमध्ये असलेल्या ४२९ तालुक्यांतील ४९ हजार ४३ शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा एकूण ५ हजार ७६० परीक्षा केंद्रावर आयेाजित करण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली. या वेळी पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला ४ लाख १८ हजार ५२; तर आठवीच्या परीक्षेला ३ लाख ३ हजार ८१४ असे एकूण ७ लाख २१ हजार ८६६ विद्यार्थी बसणार आहेत. ही शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पाडली जावी, यासाठी केंद्र संचालकांपासून ते शिपायापर्यंत असे ५१ हजार ९०८ इतके मनुष्यबळ नियुक्त करण्यात येणार आहे. यापैकी ५ हजार ७०७ केंद्रसंचालक, १०४ उपकेंद्रसंचालक, ३६ हजार २२० पर्यवेक्षक आणि ९ हजार ८७७ शिपाई आदींवर परीक्षा केंद्रावरील कामकाज आणि विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती परीक्षा परिषदेकडून देण्यात आली.
-------
मुंबईत अशी होईल परीक्षा
मुंबई शहर, उपनगर आणि महापालिकेच्या शाळांतील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एकूण १२७ परीक्षा केंद्रावर होणार आहे. यात पाचवीची परीक्षा १० हजार १७० तर आठवीची परीक्षा ९ हजार ५९४ असे एकूण १९ हजार ७६४ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती आयुक्त दराडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07847 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..