
पत्राचाळ प्रकल्पाचे काम म्हाडाकडून सुरु
सकाळ सकाळ
मुंबईत, ता. ३१ : गोरेगावातील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतले आहे. यामुळे पत्राचाळ पुन्हा चर्चेत आली आहे. हा प्रकल्प सध्या म्हाडामार्फत राबवण्यात येत असून यासाठी एका कंत्राटदाराची नेमूणक करण्यात आली आहे. या कंत्राटदाराकडून येथील पुनर्विकास प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये प्रकल्पातील मूळ गाळेधारकांच्या पुनर्वसन इमारतीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लागावा यासाठी राज्य सरकारने राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची एकसदस्यीय समिती गठित केली होती. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशीनुसार पत्राचाळीचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार पत्राचाळ गृहनिर्माण संस्थेच्या मूळ ६७२ सभासदांच्या पुनर्वसनासाठी आर- ९ भूखंडावरील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ २२ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आला. म्हाडामार्फत नेमणूक करण्यात आलेल्या कंत्राटदाराकडून रखडलेली कामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. अपूर्ण अवस्थेत असलेल्या इमारतींची कामे सध्या सुरू असून ऑगस्ट २०२४ पर्यंत मूळ गाळेधारकांना ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका देण्यात येणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07870 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..