अंधेरी जंक्शनमधील वाहतूक कोंडी फुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंधेरी जंक्शनमधील वाहतूक कोंडी फुटणार
अंधेरी जंक्शनमधील वाहतूक कोंडी फुटणार

अंधेरी जंक्शनमधील वाहतूक कोंडी फुटणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : अंधेरी सर्कल ते पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्टअखेर त्याचे लोकार्पण होणार असल्याने या भागात होणारी वाहतूक कोंडी फुटणार आहे.

अंधेरी जंक्शन भागात मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यावर उपाय म्हणून ना. सी. फडके मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय साधारण पाच वर्षांपूर्वी घेण्यात आला. तेली गल्ली जंक्शन ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला तो जोडण्यात येणार आहे. सर्वाधिक व्यस्त व वाहतूक कोंडीचा परिसर असलेल्या जंक्शन भागात परवानगीसाठीच काही वर्षे कसरत करावी लागली. २०१८ रोजी उड्डाणपुलाच्या कामासाठी परवानगी मिळाली. ऑक्टोबर २०१९ पासून बांधकामास सुरुवात झाली. उड्डाणपुलाची लांबी १२५ मीटर आहे. बांधकामासाठी ५२५ कोटीचा खर्च करण्यात आला आहे. तीन वर्षांनंतर उड्डाणपुलाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. फिनिशिंग आणि रंगरंगोटी सध्या सुरू आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ते पूर्ण होईल. ना. सी. फडके मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. उड्डाणपुलामुळे ती कमी होण्यास मदत होईल.

नव्या उड्डाणपुलामुळे अंधेरी पश्चिमेतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. किरकोळ कामे आणि रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आहे. शक्य तितक्या लवकर उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला जाईल.
- सतीश ठोसर, मुख्य अभियंता, पूल विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07884 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top