
मुंबईतील रस्त्यांवर धोका!
मुंबई, ता. ३ ः मुंबईतील वाहनांची मोठी संख्या आणि अरुंद खड्डेयुक्त रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन वर्षांची आकडेवारी बघितल्यास मुंबईत यंदाच्या वर्षी विविध ठिकाणी तब्बल १५ हजार १३२ अपघात झाले. गेल्या वर्षीची तुलना करता या वर्षी अवघ्या सहा महिन्यांत १४,००८ अपघात झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती करूनही अपघातांची संख्या रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, अपघातांमध्ये होणारे मृत्यू आणि गंभीर जखमींच्या संख्येत घट झाल्याने मात्र थोडा दिलासा मिळाला आहे.
२०२० मध्ये एकूण ८०९ अपघात झाले. त्यात १४१ जणांचा मृत्यू झाला. ८२२ जण जखमी झाले. त्या तुलनेत २०२१ मध्ये जानेवारी ते जूनची आकडेवारी बघता गेल्या वर्षी फक्त ११२२ अपघात झाले होते. या वर्षी त्यात मोठी वाढ झाली. तब्बल १५ हजार १३२ अपघात झाले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल १४ हजार अपघात जास्त झाल्याचे दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताची संख्या जास्त आहे. गंभीर अपघातांमध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला. जखमींची संख्या घटली असल्याचे महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
अपघाताची कारणे
- हेल्मेटचा वापर टाळणे
- वेगाने वाहन चालवणे
- वाहन चालवताना मोबाईलचा वापर
- मद्य पिऊन वाहन चालवणे
- रस्त्यांवरील खड्डे
अपघाताची आकडेवारी
जानेवारी ते जून २०२१ ः ११२२
मृत्यू ः २०२
जखमी ः ९४४
जानेवारी ते जून २०२२ ः १५१३२
मृत्यू ः १५६
जखमी ः ८५४
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07899 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..