अनधिकृत स्कूल व्हॅन, बसवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत स्कूल व्हॅन, बसवर कारवाई
अनधिकृत स्कूल व्हॅन, बसवर कारवाई

अनधिकृत स्कूल व्हॅन, बसवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : परिवहन विभागाने २६ ते ३१ जुलै या कालावधीत अनधिकृत स्कूल व्हॅन व स्कूल बस यांची विशेष तपासणी मोहीम राबवली असून या मोहिमेत राज्यात एकूण १,६६१ परवानाधारक वाहने; तर ५९२ विनापरवानाधारक वाहने अशा एकूण २,२५३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ५४,६६,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती परिवहन आयुक्तांनी दिली.
या मोहिमेत परवाना नसलेली वाहने, स्पीड गव्हर्नर नसलेली वाहने, आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी वाहने, वैध योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, वैध विमा प्रमाणपत्र नसलेली वाहने, परिचारक नसलेली वाहने, अग्निशमन सुविधा नसलेली वाहने, स्कूल बस नियमावलीतील इतर तरतुदींचा भंग करणारी वाहने अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई मोहीम नियमित सुरू ठेवण्याच्या सूचना परिवहन आयुक्तांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
...
सहकार्याचे आवाहन
पाल्याला ज्या बसमधून किंवा व्हॅनमधून पालक शाळेत पाठवतो, त्या बस अथवा व्हॅनचा चालक, मालक व त्या वाहनाची माहिती पालकाने आपल्याकडे ठेवावी. जर पालकांना वाहनांच्या कर्मचारी आणि वाहनांबाबतीत काही शंका असल्यास नजीकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधून शंकानिरसन करून घ्यावी. शिवाय ज्या शाळांमध्ये मुले व्हॅनद्वारे अथवा स्कूल बसद्वारे येतात, त्या शाळांनीही स्कूल बस किंवा व्हॅनच्या चालक, मालकाबाबत पुरेशी माहिती आपल्याकडे ठेवावी, सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07900 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top