हॉटेलांना औद्योगिक दर्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हॉटेलांना औद्योगिक दर्जा
हॉटेलांना औद्योगिक दर्जा

हॉटेलांना औद्योगिक दर्जा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटनाच्या वतीने महाराष्ट्रातील हॉटेल्सना औद्योगिक दर्जा देण्यासाठी तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. पर्यटन संचालनालयाकडून मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील सर्व हॉटेल्सना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहेत. पुणे विभागातर्फे ३ आणि ४ ऑगस्ट २०२२ रोजी पहिली तपासणी मोहीम सुरू होईल. पुणे विभागात जून २०२१ पासून एकूण १८१ अ-वर्गीकृत हॉटेल्सनी नोंदणी व अर्ज केले आहेत, येत्या दोनदिवसीय सत्रात तपासणी समिती आणि नियुक्त एजन्सीतर्फे या हॉटेल्सची पाहणी केली जाईल.
महाराष्ट्र सरकारने एप्रिल १९९९ मध्ये आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा दिला होता; पण याची अंमलबजावणी झाली नाही. २०२० मध्ये राज्य सरकारने अ-वर्गीकृत हॉटेल्ससाठी औद्योगिक दराने कर आणि शुल्क आकारण्याचे निकष जाहीर करताना शासन निर्णय जारी केला. तसेच अ-वर्गीकृत हॉटेल्सना नोंदणी करून लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. या आवाहनाच्या नंतर वेबसाईटवर मोठ्या संख्येने नोंदणी प्राप्त झाल्यामुळे तपासणी समिती अर्जदारांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यास सुरुवात करणार आहे.
संबंधित फायदे मिळवण्यासाठी इच्छुक असणारे अर्जदार महाराष्ट्र पर्यटन विभागात अर्ज दाखल करू शकतात. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटनाच्या https://www.maharashtratourism.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज दाखल करा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
.......
तपासणी समिती
तपासणी समितीच्या माध्यमातून पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक, अन्न व औषध प्रशासन विभाग प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक प्रतिनिधी, हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनचे स्थानिक प्रतिनिधी आणि टूर ऑपरेटर असोसिएशनचे प्रतिनिधी, अर्जदार हॉटेल्सची पाहणी करतील. क्वालस्टार या एजन्सीने स्थळांची पाहणी करण्यासाठी नियोजन आराखडा तयार केला असून ज्याचे पालन करणे समितीसाठी बंधनकारक असणार आहे.
........
महाराष्ट्रात ४४६ अर्ज पर्यटन संचालनालयाकडे प्राप्त झाले आहेत. सर्व निकषांची पूर्तता करणारे हॉटेल्स औद्योगिक दर्जा मिळण्यास पात्र असतील. नोंदणीकृत हॉटेल्सना औद्योगिक दरांनुसार वीज शुल्क, पाणीपट्टी, मालमत्ता कर आणि अकृषक कर उपलब्ध होईल.
- डॉ. धनंजय सावळकर, सहसंचालक, पर्यटन संचालनालय

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07902 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top