सीईटी हुकलेल्यांना नव्याने संधी देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईटी हुकलेल्यांना नव्याने संधी देणार
सीईटी हुकलेल्यांना नव्याने संधी देणार

सीईटी हुकलेल्यांना नव्याने संधी देणार

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सीईटी या सामायिक प्रवेश परीक्षेला सुरुवात झाली; मात्र सर्व्हरच्या बिघाडामुळे सीईटीच्या शेकडो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षेला बसू शकले नाहीत. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली आहे, त्यांना नव्याने संधी दिली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. विधीसह बी.एड., एम.एड. आदी अभ्यासक्रमांची सीईटी एक ते दोन सत्रांत घेण्यात आली; मात्र सर्व्हरमधील बिघाडामुळे कमी उपस्थिती होती, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07917 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..