
यूपीएलच्या नफ्यात २९ टक्क्यांची वाढ
यूपीएलच्या नफ्यात २९ टक्क्यांची वाढ
मुंबई, ता. ३ ः कृषी संबंधित उत्पादने तयार करणाऱ्या यूपीएल कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीतील चार पंचमांश महसूल परदेशातून मिळाला आहे. त्यांच्या नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के वाढ झाली.
या तिमाहीत त्यांना १०,८२१ कोटी रुपये महसूल मिळाला. मागील वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत ८,५१५ कोटी महसूल मिळाला होता. त्यांचा या तिमाहीतील निव्वळ नफा ८७७ कोटी रुपये हा मागील तिमाहीच्या ६७८ कोटींच्या तुलनेत २९ टक्के वाढला. त्यांच्या महसुलातील ३,४६४ कोटी रुपये दक्षिण अमेरिकेतून, १,७२८ कोटी रुपये युरोपातून, १,७९६ कोटी उत्तर अमेरिकेतून, तर भारतातून २,०६७ कोटी रुपये मिळाले. उर्वरित जगातून त्यांना १,७६५ रुपये मिळाले.
या कालावधीत त्यांनी झोटीन हे नवे खत, स्पायरोटेट्रामॅट हे कीटकनाशक आणि भारतात तांदळावरील किडीचा नाश करण्यासाठी कीडनाशक निर्माण केले. सन २०४० पर्यंत युरोपातील कार्बनडायऑक्साईड एक अब्ज मेट्रिक टनांनी कमी करण्यासाठी वेगळ्या शेतीपद्धती स्वीकारण्याची मोहीम त्यांनी सुरू केली. तसेच ब्राझीलमधील शेतकऱ्यांचे उत्पादन व नफा वाढविण्यासाठीही तेथील कंपन्यांच्या साह्याने मोहीम हाती घेतली आहे, असे कंपनीचे सीईओ जय श्रॉफ म्हणाले.
Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07927 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..