तलावांमधील पाणीसाठ्यात ११ टक्क्यांची तूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावांमधील पाणीसाठ्यात ११ टक्क्यांची तूट
तलावांमधील पाणीसाठ्यात ११ टक्क्यांची तूट

तलावांमधील पाणीसाठ्यात ११ टक्क्यांची तूट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्याने मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. सध्या तलावांमध्ये ८९.०६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाल्याने पाणीसाठा वाढत असून अद्यापही पाणीसाठ्यात ११ टक्के तूट आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रांत पावसाच्या विश्रांतीमुळे पाणीसाठा स्थिरावला होता. मंगळवारपर्यंत (ता. २) ८८.८७ टक्के पाणीसाठा होता. तो रिमझिम पावसामुळे पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, बुधवारी सकाळपर्यंत ८९.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या सातही तलावांमध्ये १२ लाख ८८ हजार ९८० दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजून साधारणतः अडीच दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, भातसा आणि तानसा या सात तलावांतून पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभरात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा लागतो. वर्षभराचा पाणीसाठा होण्यासाठी सप्टेंबरपर्यंत पाऊस पडणे गरजेचे असते. तोपर्यंत पाऊस सुरू राहिला तर वर्षभरासाठीचा पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो.

दोन वर्षांतील पाणीसाठा
वर्ष पाणीसाठा (दशलक्ष लिटर) टक्केवारी
२०२२ १२ लाख ८८ हजार ९८० ८९.०६
२०२१ ११ लाख १९ हजार ९१५ ७७.३७

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07934 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top