विनापरवाना रॅपिड टेस्ट किटवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना रॅपिड टेस्ट किटवर कारवाई
विनापरवाना रॅपिड टेस्ट किटवर कारवाई

विनापरवाना रॅपिड टेस्ट किटवर कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : विनापरवाना वैद्यकीय चाचण्यांचे किट विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. या कारवाईत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल साडेबारा लाखांचे किट जप्त केली. 
कोविड १९, एचआयव्ही, हेपॅटायटिस, सिफिलीस, मलेरिया, डेंगी, विषमज्वर आदी आजारांच्या चाचणीसाठी लागणाऱ्या रॅपिड टेस्ट किटच्या विनापरवाना विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२.४० लक्ष किमतीचा साठा जप्त करण्यात आला असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.
एफडीए मुंबई मुख्यालयाच्या गुप्तवार्ता विभागाच्या माहितीप्रमाणे २ ऑगस्ट रोजी ठाण्यातील औषध निरीक्षकांच्या पथकाने ही कारवाई केली. ठाण्यातील शिळफाटा येथील एका इमारतीत नीरजकुमार विश्वकर्मा यांच्या मालकीच्या मे. शेलमार्क लाईफ केअर प्रा. लि. भारत विको विष्टा या कंपनीवर धडक कारवाई केली. त्या वेळी या ठिकाणी सिडँक लाइफ केअर बहादूर गड, हरियाणा या उत्पादकाच्या कोविड १९, एचआयव्ही, हेपॅटायटिस, सिफिलीस, मलेरिया, डेंगी, विषमज्वर आजारांच्या चाचणीसाठी लागणाऱ्या रपिड टेस्ट किटचा मोठ्या प्रमाणावर साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
...
संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू
कारवाईत या जागेस चाचणी संचविक्रीसाठी आवश्यक असणारा परवाना मंजूर नसल्याचेही समोर आले. त्यामुळे उपलब्ध साठ्यातून प्रातिनिधिक नमुने चाचणी व विश्लेषणासाठी घेण्यात आले. उर्वरित १२.४० लक्ष किमतीचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आवश्यक तपास करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07937 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top