बँक खात्याचा निर्णय कामगारांवर सोपवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक खात्याचा निर्णय कामगारांवर सोपवा
बँक खात्याचा निर्णय कामगारांवर सोपवा

बँक खात्याचा निर्णय कामगारांवर सोपवा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : खासगी बँकांमध्येसुद्धा वेतन खाते उघडण्याची मुभा असल्याचे परिपत्रक नुकतेच एसटी महामंडळाने प्रसारित केले आहे. या निर्णयाला आता स्थगिती देण्याचा, किंबहुना तो रद्द करण्याचा प्रशासनाचा डाव असल्याने परिपत्रक रद्द करण्यासंदर्भातील अहवाल राज्य सरकारकडून मागवण्यात आला आहे, असे सांगत परिपत्रक रद्द केल्यास त्याला तीव्र विरोध करण्याचा इशारा महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एसटी महामंडळाच्या ९२ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यापूर्वी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक व भारतीय स्टेट बँक या दोन बँकांमध्ये आपले वेतन खाते उघडण्याचा अधिकार होता. या बँकांमार्फतच वेतन दिले जात असे; मात्र बँकिंग क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाल्याने कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार इतर खासगी बँकांमध्येसुद्धा वेतन खाते उघडण्याची मुभा देण्यात आली होती.
विविध बँकांमध्ये कर्जावरील व्याजदर कमी आकारला जात आहे. याशिवाय ठेवीवरसुद्धा चांगले व्याज मिळत आहे. अन्य विविध आकर्षक योजनांचा लाभसुद्धा बँका देत आहेत. काही बँकांमध्ये कर्जावरील व्याजदर नऊ टक्के असून एसटीच्या बँकेमध्ये ११.४० टक्के इतका आहे. एसटी कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पेन्शन खाते उघडावे लागते. स्टेट बँकेत निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारची १५ लाख गुंतवणूक करण्याची बचत योजना असून तिथे बहुतांशी कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केली आहे. निवृत्तीनंतर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडावे लागते. त्यामुळे आधीच इतर बँकांमध्ये खाते उघडल्यास हरकत काय, असा प्रश्न बरगे यांनी उपस्थित केला आहे.
...
व्याजदर कमी करण्यास हरकत काय?
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक ही एसटी कर्मचाऱ्यांची बँक असून ७६ हजार कर्मचारी या बँकेचे सभासद आहेत. या बँकेने सुरुवातीच्या काळात खूप चांगल्या योजना आणल्या होत्या. त्याचा सभासदांना चांगला फायदा झाला हेसुद्धा नाकारता येणार नाही, पण आता बँकिंग क्षेत्रात खूप मोठी प्रगती झाली असून या स्पर्धेत आता ही बँक कमी पडू लागली आहे. बँकेने इतर बँकांच्या स्पर्धेत उतरून कर्जावरील व्याज दर कमी करण्यास काय हरकत आहे, असा सवाल करून एसटी बँकेतील पैसा शेवटी सभासदांचा असून तो त्यांच्या उपयोगी आला पाहिजे, असे मतही बरगे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07938 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..