मुंबईसाठी २२५ मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईसाठी २२५ मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प
मुंबईसाठी २२५ मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प

मुंबईसाठी २२५ मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प

sakal_logo
By

मुंबईसाठी २२५ मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प
टाटा पॉवरकडून २५ वर्षे वीजपुरवठा होणार ः मुंबईच्या नॉन-कार्बन ऊर्जा पुरवठ्याचे प्रमाण वाढणार


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : टाटा पॉवर ग्रीन एनर्जी लिमिटेड (टीपीजीईएल) या टाटा पॉवरच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीने राजस्थानात २२५ मेगावॅट क्षमतेचा हायब्रिड ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामध्ये निर्माण केली जाणारी वीज टाटा पॉवर, मुंबई डिस्ट्रिब्युशनला पुरवली जाणार आहे. वीज खरेदी करारानुसार कंपनी २५ वर्षे वीजपुरवठा करणार आहे.
टाटा पॉवरने विकसित केलेला हा पहिला हायब्रिड प्रकल्प आहे. दरवर्षी सुमारे ७०० मेगायुनिट्स वीज या प्रकल्पातून निर्माण केली जाणार आहे. या प्लांटमुळे दरवर्षी जवळपास ७०० मिलियन किलो कार्बन डायऑक्साईड ऑफसेट केला जाईल. सौर आणि पवन प्रकल्प एकत्र असल्याने जास्त क्षमता वापर घटकाचा अनोखा लाभ मिळेल. हायब्रिड वीज मिळणार असल्याने आता टाटा पॉवरच्या मुंबईकर ग्राहकांच्या वीजपुरवठा पोर्टफोलिओमध्ये नॉन-कार्बन विजेचे प्रमाण ३८ टक्के इतके वाढणार आहे.
टाटा पॉवर ग्रीन एनर्जी लिमिटेडला हा प्रकल्प देण्यात आला होता. यातील सौर ऊर्जेच्या भागाची अंमलबजावणी टाटा पॉवरची ईपीसी कंपनी टाटा पॉवर सोलर सिस्टिम्स लिमिटेडने केली आहे. राजस्थानातील नूरसार येथील १२०० एकर जागेवर आखून दिलेल्या वेळेत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये ५ लाख ७९ हजार ४८८ मॉड्युल्स आणि कंपनीच्या सध्याच्या विंड ॲसेट्समधून विविध रेटिंग्सचे १०३ विंड एनर्जी जनरेटर्स वापरण्यात आले आहेत. वाळूच्या अनेक उंच ढिगाऱ्यांमुळे खडबडीत झालेला भूभाग, ५० अंश सेल्सियस इतके प्रचंड तापमान आणि असामान्य पाऊस अशी कितीतरी आव्हाने असूनदेखील त्यांना न जुमानता हा प्रकल्प आखून दिलेल्या वेळेत पूर्ण करण्यात कंपनीने यश मिळवले आहे.
हा हायब्रिड प्रकल्प सुरू झाल्यामुळे टाटा पॉवरची एकूण नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता ५५२४ मेगावॅटवर जाऊन पोहोचली असून त्यापैकी संस्थापित क्षमता ३८५९ मेगावॅट आहे व १६६५ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम इन्स्टॉलेशनच्या विविध टप्प्यांवर सुरू आहे.

कोट
आमचा पहिला २२५ मेगावॅट क्षमतेचा हायब्रिड प्रकल्प राजस्थानात सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या प्रकल्पातून आमच्या मुंबई डिस्कॉमला व त्यांच्या ग्राहकांना वीजपुरवठा केला जाईल. यामुळे त्यांच्या नॉन-कार्बन वचनबद्धतेत लक्षणीय वाढ होईल. देशाची शुद्ध आणि हरित ऊर्जा उद्दिष्ट्ये पूर्ण व्हावीत यासाठी नॉन-कार्बन ऊर्जेचा वापर करण्याची आमची वचनबद्धता यामधून दिसून येते.
- डॉ. प्रवीर सिन्हा, टाटा पॉवरचे सीईओ आणि एमडी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07940 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top