ऐरोली-कटाई नाका मार्गाचे ५३.७५ टक्के काम पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐरोली-कटाई नाका मार्गाचे ५३.७५ टक्के काम पूर्ण
ऐरोली-कटाई नाका मार्गाचे ५३.७५ टक्के काम पूर्ण

ऐरोली-कटाई नाका मार्गाचे ५३.७५ टक्के काम पूर्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : ठाणे-बेलापूर उन्नत मार्गातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या ऐरोली-काटई नाका मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम वेगाने सुरू आहे. सद्यस्थितीत प्रकल्पाचे ५३.७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, हे काम झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईमधील अंतर ७ किलोमीटरने कमी होऊन प्रवासाच्या वेळेत सुमारे १५ मिनिटांची बचत होणार आहे.
कल्याण-डोंबिवलीहून मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना महापे, शिळफाटा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामध्ये प्रवाशांचा बराच वेळ वाया जातो. या कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी एमएमआरडीएने ऐरोली ते काटई नाका असा १२ किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. हा मार्ग तीन टप्प्यांमध्ये उभारण्यात येत आहे. ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्र. चार असा पहिला टप्पा, ऐरोली पूल ते ठाणे-बेलापूर रस्ता असा दुसरा टप्पा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते काटई नाका अशा तीन टप्प्यांत हा मार्ग उभारण्यात येणार आहे. या मार्गातील दुसऱ्या टप्प्यातील कामांनी वेग घेतला आहे. ३ अधिक ३ मार्गिकांचा हा टप्पा आहे. सध्याच्या ऐरोली ते मुलुंड पुलाला हा मार्ग जोडण्यात येईल. या टप्प्यातील मार्गिका २.५७४ किलोमीटर लांबीची आहे. या मार्गाचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07944 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top