डेंटिस्ट पत्नीला पोटगी मिळू शकत नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंटिस्ट पत्नीला पोटगी मिळू शकत नाही!
डेंटिस्ट पत्नीला पोटगी मिळू शकत नाही!

डेंटिस्ट पत्नीला पोटगी मिळू शकत नाही!

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : उच्चशिक्षित असलेल्या आणि व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या पत्नीला कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पोटगी मिळू शकत नाही, असा निकाल महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे; मात्र त्यांच्या मुलांना वडिलांनी निर्वाह भत्ता द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
अर्जदार महिलेने पतीच्या आणि सासरच्या लोकांविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार तक्रार केली आहे. तिने स्वतःसाठी आणि मुलांसाठी एकूण १.१० लाख रुपये पोटगी पतीकडून मिळण्याची मागणी केली आहे. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असून खूपच लहान आहेत. तिचे सासर राजस्थानमध्ये आहे आणि पतीचा व्यवसाय आहे. सन २०१८ मध्ये ती मुंबईमध्ये माहेरी निघून आली. त्या वेळी ती दुसऱ्या मुलासाठी गर्भवती होती. सासरची मंडळी खूप श्रीमंत आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पोटगी द्यावी, अशी मागणी केली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07958 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..