तिहेरी बॉम्बस्फोट खटला तातडीने चालवण्‍याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तिहेरी बॉम्बस्फोट खटला तातडीने चालवण्‍याचे आदेश
तिहेरी बॉम्बस्फोट खटला तातडीने चालवण्‍याचे आदेश

तिहेरी बॉम्बस्फोट खटला तातडीने चालवण्‍याचे आदेश

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : सन २०११ मध्ये घडलेल्या तिहेरी बॉम्बस्फोटाच्या खटल्याची दैनंदिन सुनावणी घ्यावी, ही आरोपी आणि अभियोग पक्षाची मागणी विशेष न्यायालयाने नामंजूर केली आहे. मात्र या खटल्याची सुरुवात लवकरात लवकर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
सन २०११ मध्ये १३ जुलैमध्ये दादर येथील कबूतर खाना, आॅपेरा हाऊस आणि झवेरी बाजार येथे रात्रीच्या सुमारास बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये २७ जण मृत्युमुखी पडले तर शंभरहून अधिक गंभीर जखमी झाले होते. या खटल्याला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. या खटल्याची सुनावणी दैनंदिन स्वरूपात घ्यावी आणि तातडीने घ्यावी, अशी मागणी करणारा अर्ज आरोपी आणि अभियोग पक्षाने केला होता. न्यायालयाने यापैकी अंशतः अर्ज मंजूर केला. सध्याच्या जुन्या आणि व्यग्र प्रकरणांमुळे नियमित सुनावणी घेता येणे शक्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र खटला तातडीने सुरू करण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली. या प्रकरणात आरोपी यासिन भटकळ प्रमुख असून अन्य एका आरोपीचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07959 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top