महावितरण यंत्रणेचे होणार सक्षमीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण यंत्रणेचे होणार सक्षमीकरण
महावितरण यंत्रणेचे होणार सक्षमीकरण

महावितरण यंत्रणेचे होणार सक्षमीकरण

sakal_logo
By

महावितरण यंत्रणेचे सक्षमीकरण
विजेसाठी १४ हजार २६६ कोटींचा खर्च

मुंबई, ता. १० : भविष्यातील विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने सध्याच्या वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १४ हजार २६६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठ्याची गुणवत्ता सुधारण्यासह ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळणार असल्याचा दावा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केला.
महावितरणच्या ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह वीजपुरवठा करण्यासाठी वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी १४ हजार २६६ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
राज्यातील वीज वितरण कंपन्यांची कार्यक्षमता वाढवून आर्थिक स्थिरता सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक सहाय्याने सुधारित वितरण क्षेत्र योजना (आरडीएसएस) राबवण्यात येणार आहे. या योजनेमुळे महावितरणच्या वीज वितरण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडून येणार आहे. सशर्त आर्थिक सहाय्याद्वारे आर्थिक स्थिरता व परिचालन कार्यक्षमतेत सुधारणे करणे, वीज वितरण पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, वीजपुरवठ्याची गुणवत्ता व उपलब्धता वाढवणे इत्यादी कामांचा योजनेत समावेश आहे.

२४ तास अखंडित वीजपुरवठा
राज्यात विविध ठिकाणी ३७७ नवीन उपकेंद्रे उभारली जाणार आहेत. २९९ उपकेंद्रांत अतिरिक्त रोहित्रे बसवली जाणार आहेत. २९२ उपकेंद्रांची क्षमतावाढ करून सुमारे २९ हजार ८९३ नवीन वितरण रोहित्रे बसवली जातील. त्याचप्रमाणे २१ हजार ६९१ सर्किट किमी उच्चदाब वाहिनी टाकण्यात येईल. ४ हजार १७१ सर्किट किमी उच्चदाब भूमिगत वाहिनीही टाकली जाणार आहे. या योजनेमुळे ग्राहकांना २४ तास अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07961 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..