व्ही केअर फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरची रक्षक मोहिम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्ही केअर फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरची रक्षक मोहिम
व्ही केअर फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरची रक्षक मोहिम

व्ही केअर फाउंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरची रक्षक मोहिम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : व्ही केअर फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरने रक्षक मोहीम सुरू केली आहे. कर्करुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्‍हावे, यासाठी ही मोहीम काम करणार आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रतीक गांधी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. ते व्ही केअर फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रक्षक म्हणून सामील झाले. याचबरोबर त्यांनी या मोहिमेची सुरुवात रक्तदान करून केली. रक्षक मोहिमेचा उद्देश रक्तदात्यांचा डेटाबेस गोळा करणे आहे. ते सक्रिय स्वयंसेवकांना एकत्र आणतील. ज्यामुळे जेव्हा रक्ताची गरज भासेल तेव्हा ते रक्तदान करण्यास तयार असतील.

माझ्या जास्तीत जास्त क्षमतेनुसार लोकांना मदत करण्याचा माझा नेहमीच कल असतो. जेव्हा माझे वडील
कॅन्सरशी लढा देत होते, त्यांना दर दुसऱ्या दिवशी रक्त आणि प्लेटलेट्स दिले जात होते. पण ते कुठून उपलब्ध होते हे माहिती नव्हते. हीच वेळ आहे रक्तदान करुन कृतज्ञता व्यक्त करण्याची.
– प्रतीक गांधी, अभिनेता

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07968 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..