ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांना अनुदानीत दराने सीएनजी दया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांना अनुदानीत दराने सीएनजी दया
ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांना अनुदानीत दराने सीएनजी दया

ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांना अनुदानीत दराने सीएनजी दया

sakal_logo
By

ऑटोरिक्षा-टॅक्सीचालक मालकांना अनुदानित दराने सीएनजी द्या
मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनची मागणी
राज्य सरकारला शशांक राव यांचे तिसरे पत्र


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : खटुवा समितीच्या सूत्रानुसार इंधनाच्या आणि जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या तुलनेत सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचे भाडे प्रचंड वाढू शकते. त्याचा आर्थिक भुर्दंड मुंबईकरांना बसू शकतो, त्यामुळे सरकारने ऑटो रिक्षा- टॅक्सीचालक मालकांना ४० टक्के अनुदानित दरात सीएनजी देण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे. यासंदर्भात तत्कालीन सरकारला दोन पत्र, तर विद्यमान सरकारला आता नव्याने पत्र पाठवून मागणी केली आहे. सोमवारी केंद्रातील पेट्रोलियम मंत्री आणि अर्थमंत्र्यांनासुद्धा मागणीचे पत्र मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियन पाठवणार आहे.

ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालक-मालकांना यापूर्वी सीएनजी वापरण्यास सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे एमएमआर क्षेत्रातील सर्वच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी सीएनजीवर चालत आहेत. खाजगी वाहनांना सीएनजीने इंधन देण्यात आले आणि दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत भारतातला मिळणारा सीएनजी गॅस व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात परदेशातून सीएनजी आयात करण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

ऑटो रिक्षा आणि टॅक्सी हे सार्वजनिक प्रवासी वाहतूक आहेत. यातून लाखो प्रवासी रोज एमएमआर क्षेत्रामध्ये प्रवास करतात. भाडेदर वाढल्यास प्रवाशांना आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालकांना त्यांच्या व्यवसायकरिता लागणारा सीएनजी गॅस ४० टक्के अनुदानित दराने देण्यात यावा, जेणेकरून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचालक-मालकांना सीएनजी गॅस कमी दरात उपलब्ध होईल व सामान्य नागरिकांवर त्याचा बोजा येणार नाही. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात सीएनजी गॅसच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालकांना प्रचंड आर्थिक भार सोसावा लागत असल्याचे शशांक राव यांनी सांगितले आहे.

कोट -
भाव वाढल्यास तात्पुरता तोडगा निघेल. खटुवा समितीच्या सूत्रानुसार महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे सुमारे ६ रुपये भाडे वाढू शकते. मात्र याचा परिणाम सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे सार्वजनिक प्रवासी सेवेला ४० टक्के अनुदानाने सीएनजी दिल्यास ऑटो रिक्षा टॅक्सीचालक - मालकांना दिलासा मिळेल आणि प्रवाशांनासुद्धा आर्थिक फटका बसणार नाही.
- शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियन

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07970 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..