अमृत महोत्सवी अन्न सुरक्षा सप्ताह अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमृत महोत्सवी अन्न सुरक्षा सप्ताह अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम
अमृत महोत्सवी अन्न सुरक्षा सप्ताह अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम

अमृत महोत्सवी अन्न सुरक्षा सप्ताह अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम

sakal_logo
By

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अन्न सुरक्षा सप्ताह
अन्न व औषध प्रशासनाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून ‘अन्न सुरक्षा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शालेय विद्यार्थी, महिला, प्रतिष्ठित नागरिक, विविध सेवाभावी संस्था यांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका व कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून प्रशासनाचे समाजातील महत्त्व पटवून देण्यास मदत होईल, असे एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ हा कायदा ५ ऑगस्ट २०११ या दिवशी अंमलात आल्याने व संपूर्ण भारतात तो लागू करण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाकडून ५ ते १२ ऑगस्ट २०२२ या काळात राज्यात अन्न सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

अन्न व्यावसायिकांमध्ये जनजागृती
अन्न सुरक्षा सप्ताह उपक्रम संपूर्ण राज्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, अन्न व्यावसायिक तसेच सामान्य जनतेसाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या उद्देशाने विभागीय तसेच जिल्हास्तरावर शिबिर, कार्यशाळा, वृत्तपत्र प्रकाशन, प्रभातफेरी, व्यसनमुक्ती शपथ, कमी तेल, मीठ, साखरेतील पाककृती स्पर्धा, व्हिडीओ व पोस्टर्सच्या माध्यमातून राज्यातील जनता तसेच अन्न व्यावसायिक यांच्यामध्ये जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07971 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..