आयआयटीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयआयटीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले
आयआयटीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले

आयआयटीतील विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ : आयआयटी मुंबई प्रशासनाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला १८ दिवस पूर्ण झाले असून त्यातून तोडगा निघावा म्हणून ५ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला होता. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शनिवारपासून विद्यार्थ्यांनी आयआयटी संकुलात उपोषणाला सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आयआयटी मुंबईने विद्यार्थ्यांना विचारात न घेता विविध अभ्यासक्रमांचे शुल्क तब्बल ४५ टक्क्यांहून अधिक वाढवले आहे. त्याविरोधात १९ जुलैपासून विद्यार्थ्यांकडून विविध मार्गांनी शुल्कवाढ रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पाचव्‍या दिवशी प्रशासनाकडून ओपन हाऊसच्या माध्यमातून चर्चा करण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्यात आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. दोन दिवसांपूर्वी ट्विटवरही वादळ नावाचे आंदोलन छेडण्यात आले. त्यात जगभरातील आजी-माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ५ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रशासनाला अल्टिमेटम दिला होता. मात्र तो संपल्याने आम्ही उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. रविवारीही (ता. ७) त्यांचे आंदोलन सुरू राहणार आहे. शुल्कवाढ रद्द होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. पहिल्या दिवशी पाच विद्यार्थी उपोषणाला बसले असले, तरी रविवारपासून त्यांची संख्या वाढत जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी विद्यार्थी प्रतिनिधींसोबत चर्चा
आयआयटी प्रशासनाने आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी शनिवारी पुन्हा एक पाऊल पुढे टाकले. सायंकाळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयआयटी प्रशासनाने चर्चेची तयारी दर्शवली आहे. सोमवारी (ता. ८) आपले दोन प्रतिनिधी आमच्याकडे पाठवा. त्यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07984 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top