महावितरणच्या वीजबिलावर तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या वीजबिलावर तिरंगा
महावितरणच्या वीजबिलावर तिरंगा

महावितरणच्या वीजबिलावर तिरंगा

sakal_logo
By

महावितरणच्या वीजबिलावर तिरंगा
ऑगस्ट महिन्यातील वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध संस्थांकडून उपक्रम राबविण्यात येत आहेत. केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम जाहीर केला असून यामध्ये महावितरण कंपनी सहभागी झाली आहे. त्यानुसार महावितरणने ऑगस्ट महिन्यातील सर्व वीजबिलांवर ‘हर घर तिरंगा’चे स्टीकर्स चिकटवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचविला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील काही भाग वगळता चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरात महावितरणची वीज आहे. सध्या राज्यात महावितरणचे एकूण २ कोटी ८८ लाख २८ हजारांहून अधिक ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती २ कोटी १५ लाख ४३ हजार, वाणिज्यिक २० लाख ५६ हजार, औद्योगिक ३ लाख ९६ हजार, शेतीपंपाचे ४४ लाख २५ हजार याशिवाय उर्वरित इतरही ग्राहकांचा समावेश आहे.
केंद्र सरकारलाही वीजबिल हे प्रत्येक घराघरांत तिरंगा पोहोचविण्यासाठी अतिशय उत्तम माध्यम वाटले. त्याप्रमाणे केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणला दिले. तोच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी तातडीने पाऊल उचलत सर्व वीजबिलांवर तिरंगा लावण्याचे ठरवले. त्यानुसार काही दिवसांत त्या-त्या भागातील ‘बिलींग सायकल’नुसार प्रत्येकाच्या घरी तिरंगा पोहोचविण्याचे काम महावितरणने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07985 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..