नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीस परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीस परवानगी
नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीस परवानगी

नवाब मलिकांना वैद्यकीय तपासणीस परवानगी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले आमदार नवाब मलिक यांना किडनीसंबंधित विशेष वैद्यकीय तपासणी करण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.
कुर्लामधील जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित गैरव्यवहारात ईडीने मलिक यांना फेब्रुवारीमध्ये अटक केली आहे. या व्यवहारात गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या हस्तकांकडून साह्य घेण्यात आले आणि धमकावून जमीन बळकावण्यात आली असा आरोप ईडीने ठेवला आहे. ते सध्या प्रकृती ठीक नसल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. याच पार्श्र्वभूमीवर त्यांची एक विशिष्ट पद्धतीने तपासणी करण्याची मुभा आज न्यायालयाने दिली. रेनल स्कॅन वैद्यकीय तपासणी करण्यासाठी न्यायालयाने त्यांना मुभा दिली. ही चाचणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञ निर्णय देतील, असे या निर्देशांमध्ये स्पष्ट केले. मलिक यांनी यापूर्वी न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती; मात्र त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07987 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top