एसी इलेक्ट्रिक बसमधून करा ‘मुंबई दर्शन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसी इलेक्ट्रिक बसमधून करा ‘मुंबई दर्शन’
एसी इलेक्ट्रिक बसमधून करा ‘मुंबई दर्शन’

एसी इलेक्ट्रिक बसमधून करा ‘मुंबई दर्शन’

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः बेस्ट उपक्रम रविवारी (ता. ७) ७५ वर्षे पूर्ण करत आहे. त्यानिमित्त बेस्ट उपक्रमातर्फे ‘अमृतमहोत्सव’ साजरा करण्यात येत असून मुंबईकरांसाठी विविध योजना आणण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटकांसाठी ‘होप ऑन - होप ऑफ’ म्हणजेच ‘हो-हो’ सेवा सुरू करण्यात येत आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना १५० रुपयांत वातानुकूलित इलेक्ट्रिक बसमधून मुंबईभर फिरता येणार आहे.

पर्यटकांना सुरक्षित आणि किफायतशीर सेवा पुरवण्याच्या दृष्टीने बेस्ट उपक्रमातर्फे त्यांच्यासाठी ‘होप ऑन-होप ऑफ’ (Hop On Hop Off) म्हणजेच ‘हो-हो’ वातानुकूलित इलेक्ट्रिक पर्यटन बस सुरू करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दर एक तासाच्या अंतराने बस सोडण्यात येईल. पर्यटक एखाद्या पर्यटनस्थळी बसमधून उतरून संबंधित स्थळाची पाहणी केल्यानंतर पुढील फेरीच्या गाडीत बसून दुसऱ्या ठिकाणपर्यंतचा प्रवास करू शकणार आहे. पर्यटकांना बेस्ट उपक्रमाच्या इतर बसमार्गांचा वापर करूनही मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील.
सर्व पर्यटक आणि मुंबईकरांनी किफायतशीर अशा बससेवेचा लाभ घेऊन पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

असा होणार प्रवास
१. ‘हो-हो’ बस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल. म्युझियम, गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, बाबुलनाथ, पेडर रोड, हाजी अली, महालक्ष्मी रेसकोर्स, धोबी घाट (महालक्ष्मी स्थानक) आणि जिजामाता उद्यानमार्गे जे. जे. उड्डाणपुलावरून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी ती चालवण्यात येईल.
२. सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत सेवा सुरू असेल. बससेवेचे पर्यटन शुल्क प्रतिव्यक्ती आणि प्रत्येक बसफेरीसाठी सर्व करांसहित १५० रुपये आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b07990 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..