सौर रुफटॉप योजनेचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सौर रुफटॉप योजनेचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
सौर रुफटॉप योजनेचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

सौर रुफटॉप योजनेचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
भांडुप, ता. ७ : सौर रुफटॉप योजनेअंतर्गत महावितरणकडे आलेल्या अर्जांची प्रक्रिया उपविभागीय कार्यालयाने तातडीने पूर्ण करावी. या कामात हयगय करणाऱ्या एजन्सींवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे यांनी दिला आहे. छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत होते. तर नेटमिटरिंगद्वारे महावितरणकडून वर्षाअखेर शिल्लक वीजदेखील विकत घेतली जाते. या योजनेची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी महावितरणचे प्रकल्प संचालक रेशमे यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, टोरंट पॉवरचे अधिकारी, तसेच या योजनेसाठी नेमलेल्या एजन्सीच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली.

या वेळी बोलताना रेशमे म्हणाले की, या योजनेचा लाभ घेऊन ग्राहकांचा पर्यावरण संरक्षणात हातभार लागू शकतो. त्याचबरोबर ग्राहकाला वीज बिलसुद्धा कमी येते. ज्यामुळे रोहित्रावरचा ताण कमी होऊ शकतो. या योजनेला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक मंडळ, विभागीय, उपविभागीय कार्यालय, तसेच एजन्सीने प्रयत्न करावेत. हाऊसिंग सोसायटीस व अशा इतर ठिकाणी कॅम्प घेऊन योजनेबाबत सविस्तर माहिती ग्राहकांना द्यावी. याशिवाय, झोपडपट्टी असलेल्या भागात जनजागृती केल्यास तेथील ग्राहकांनासुद्धा याचा फायदा होऊ शकतो.

घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त साह्य देण्यात येणार आहे. रुफटॉप सौर योजनेमधून घरगुती ग्राहकांसाठी अटी व शर्तीसह १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत अनुदान देण्यात येते; परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.
महावितरण रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी ऑनलाईन अर्जाची सोय महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08006 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..