पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाने करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाने करावा
पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाने करावा

पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाने करावा

sakal_logo
By

पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडाने करावा
तातडीने निर्णय घेण्याची रहिवाशांची मागणी : प्रकल्प रखडवल्याने विकासकावर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास विकासकाने गेल्या तेरा वर्षांपासून रखडवला आहे. त्यामुळे म्हाडाने विकासकावर कारवाई करत प्रकल्पाचे करार रद्द करत विकासकाला दणका दिला आहे. येथील इमारती धोकादायक झाल्याने म्हाडाने तातडीने या वसाहतीचा पुनर्विकास करावा, अशी मागणी रहिवाशांकडून होऊ लागली आहे.
अंधेरी पूर्वेला अंधेरी पीएमजीपी वसाहत असून येथे १७ इमारती आहेत. या इमारती जीर्ण झाल्याने रहिवाशांनी पुनर्विकासासाठी एका खाजगी विकासकाची नेमणूक केली; परंतु गेल्या १३ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे. विकासक पुनर्विकासाचे काम सुरू करत नसल्याने रहिवाशांनी गृहनिर्माण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अधिकऱ्यांनी केलेल्या कागदपत्रांच्या पाहणीत विकासक आर्थिक सक्षम नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्याप्रमाणे विकासकाचे पुनर्विकासाचे सर्व अधिकार रद्द करून हा पुनर्विकास म्हाडाने करावा किंवा सक्षम विकासकाची नेमणूक करून प्रकल्प मार्गी लावावा, असे आदेश गृहनिर्माण विभागाने गेल्या वर्षी दिले.

त्यानुसार म्हाडाने नुकताच विकासकासोबत केलेला करार रद्द करून विकासकाला दणका दिला आहे. विकासकावर कारवाई होताच रहिवाशांनीही पुनर्विकासासाठी पुन्हा धावपळ सुरू केली आहे. इतर खाजगी विकासकामार्फत वसाहतीचा पुनर्विकास करण्याऐवजी म्हाडाने पुनर्विकास केल्यास म्हाडाला सर्वसामान्य नागरिकांना घर देण्यासाठी मुंबईत शेकडो घरे उपलब्ध होतील.

चौकट
इमारतींवर प्लास्टिक टाकून दिलासा...
वसाहतीमधील काही इमारती धोकादायक झाल्या असून अधूनमधून घरातील स्लॅब कोसळत आहे. तसेच पावसाळ्यात तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील घरात छतामधून पाणी गळती होऊ लागली आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्पुरत्या स्वरूपात इमारतींवर प्लास्टिक कागद टाकून दिला असल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला असल्याचे रहिवाशी सांगत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08011 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..