राज्यात बीए ४-५ व्हेरीयंटचे तीन नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात बीए ४-५ व्हेरीयंटचे तीन नवे रुग्ण
राज्यात बीए ४-५ व्हेरीयंटचे तीन नवे रुग्ण

राज्यात बीए ४-५ व्हेरीयंटचे तीन नवे रुग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात  बीए ४ चा १ आणि  बीए ५ चे २, तर बीए २.७५ व्हेरियंटचे १६ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण पुणे येथील आहेत.

पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली. या सर्व रुग्णांचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए ४ आणि बीए ५ रुग्णांची संख्या २७५; तर  बीए २.७५ रुग्णांची संख्या २५० झाली आहे. बीए ४ व ५ चे रुग्ण पुण्यात १८०, मुंबईत ५१, ठाणे १६, रायगड ७, सांगली, ५, नागपूर ८, पालघर, ४, कोल्हापूर २ इतके आढळले आहेत; तर बीए २.७५ चे पुणे येथे १७५, नागपूर ३३, यवतमाळ १२, सोलापूर ९, मुंबई ५, अकोला ६, ठाणे ३, वाशिम २ अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08012 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..