मुंबईत पुन्हा ‘ऑरेंज’ अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत पुन्हा ‘ऑरेंज’ अलर्ट
मुंबईत पुन्हा ‘ऑरेंज’ अलर्ट

मुंबईत पुन्हा ‘ऑरेंज’ अलर्ट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : जून महिन्यात उशिरा सुरू झालेल्या पावसाने त्यानंतर दमदार हजेरी लावली. जुलैच्या मध्यापासून पावसाने उसंत घेतली होती; मात्र हवामान खात्याने आता पुन्हा मान्सून सक्रिय होणार असून पुढील चार दिवस जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

१०-१५ दिवसांच्या मोठ्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्यासाठीचे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी राज्यभरात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर सोमवार ते गुरुवारपर्यंत मुंबईसह कोकण, मध्य-महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार; तर काही ठिकाणी तुरळक, हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पुढील चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रविवारपासून पावसाने हजेरी लावल्याने म्यान केलेल्या छत्र्या पुन्हा बाहेर आल्या आहेत. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे काही लोक त्रासले असले, तरी काही लोकांनी मात्र वीकेंडचा आनंद घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08018 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..