जेईई मेन्स सत्र २च्या अंतिम उत्तर तालिका जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेईई मेन्स सत्र २च्या अंतिम उत्तर तालिका जाहीर
जेईई मेन्स सत्र २च्या अंतिम उत्तर तालिका जाहीर

जेईई मेन्स सत्र २च्या अंतिम उत्तर तालिका जाहीर

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : देशातील आयआयटीसह इतर नामवंत शैक्षणिक संस्थांतील अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्स सत्र २च्या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका रविवारी (ता. ७) जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जेईई मेन्स सत्र २ या परीक्षेचा लवकरच निकाल जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशातील आयआयटीसारख्या राष्ट्रीय संस्थांमध्ये अभियांत्रिकी पदवी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई मेन्सची या वर्षातील दुसऱ्या सत्राची परीक्षा २५ ते ३० जुलै या कालावधीत पार पडली होती. यानंतर या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका रविवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे हा निकाल लवकरच जाहीर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जेईई मेन्स ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येते. विद्यार्थी या परीक्षेला दोन्ही वेळेला बसू शकतात. यातून ज्या परीक्षेत चांगले गुण मिळाले ते गुण ग्राह्य धरून विद्यार्थी अभियांत्रिकी पदवीचे प्रवेश घेत असतात.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08020 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..