आयडॉलमध्ये एमएमएस-एमबीए, एमसीएसाठी प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयडॉलमध्ये एमएमएस-एमबीए, एमसीएसाठी प्रवेश
आयडॉलमध्ये एमएमएस-एमबीए, एमसीएसाठी प्रवेश

आयडॉलमध्ये एमएमएस-एमबीए, एमसीएसाठी प्रवेश

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत (आयडॉलमध्ये) लवकरच एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) आयडॉलला हे अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमासाठी आयडॉल लवकरच प्रवेश परीक्षा घेणार आहे.
एआयसीटीईने आयडॉलला एमएमएस-एमबीएसाठी ७२० जागा; तर एमसीएसाठी २ हजार जागांना मान्यता दिली आहे; मात्र त्यासाठी यूजीसीची मान्यता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ती मिळाल्यास आयडॉलमध्ये एमएमएस-एमबीए व एमसीए या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, जुलै सत्राच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीमुळे आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांना विविध कारणांमुळे आयडॉलमध्ये प्रवेश घेता आला नाही, त्यांना यादरम्यान संधी उपलब्ध होणार आहे.
आयडॉलच्या पदवी, पदव्युत्तर आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला २५ जूनपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत तब्बल १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती आयडॉलकडून देण्यात आली. आयडॉलसाठी ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन आयडॉलकडून करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमांचा समावेश
आयडॉलमध्ये पदवी स्तरावरील प्रथम वर्ष बी.ए., बी.कॉम., बी.कॉम. अकाऊंट्स अँड फायनान्स, बी.एस्सी. आय.टी., बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम; तर पदव्युत्तर स्तरावरील प्रथम वर्ष एम.ए. (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी, हिंदी, इंग्रजी), एम.ए. शिक्षणशास्त्र, एम.कॉम., एम.एस्सी. गणित, एम.एस्सी. आय.टी., एम.एस्सी..कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पी.जी. डी.एफ.एम. या अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08046 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..