अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन
अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन

अल्पसंख्याक शिष्यवृत्तीसाठी अर्जाचे आवाहन

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : राज्यातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास व गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पहिली ते दहावी आणि पुढे बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती तर खास मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या दोन्हीही योजनांसाठी विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली असल्याची माहिती शिक्षण संचालक (योजना) डॉ. दिनकर पाटील यांनी दिली.
अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही केंद्र शासनाची योजना आहे. सदर योजनेमधून मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील इयत्ता नववी व दहावीच्या मुलींसाठी वार्षिक रुपये पाच हजार व अकरावी व बारावीच्या मुलींसाठी वार्षिक रुपये सहा हजार शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी विद्यार्थ्यांनी www.scholarships.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन डॉ. दिनकर पाटील यांनी केले आहे.
तर प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून धार्मिक अल्पसंख्याक समाजातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व मान्यताप्राप्त शासकीय, निमशासकीय व खासगी आणि सर्व माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेत केंद्र शासनाने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी व जैन या धर्माचा समावेश केलेला आहे. विद्यार्थ्यांना निवड झाल्यास एक हजार रुपये १० हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जात असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नूतनीकरासाठी सात लाख ८४ हजार २०१ पात्र विद्यार्थी आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात नवीन पाच लक्ष अर्ज अपेक्षित आहेत. नवीन व नूतनीकरण मिळून १३ लाख अर्जांचे उद्दिष्ट संचालनालयाने ठेवले आहे; तर बेगम हजरत महल यांच्या नावे नववी ते बारावीमधील मुलींसाठी असलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी ६० हजार अर्जांचे उद्दिष्ट ठेवले आहे. या शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी केवळ नवीन अर्ज मुलींना भरता येतात, यात नूतनीकरणाची तरतूद नाही. ही शिष्यवृत्ती नववी ते बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील फक्त मुलींसाठी असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08049 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..