कंडक्टरला माहराणप्रकरणी सहा महिने कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कंडक्टरला माहराणप्रकरणी सहा महिने कारावास
कंडक्टरला माहराणप्रकरणी सहा महिने कारावास

कंडक्टरला माहराणप्रकरणी सहा महिने कारावास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ९ : नऊ वर्षांपूर्वी बेस्ट बसच्या नियमांचे पालन न करता वाहकाला मारहाण केल्याच्या आरोपात दोषी ठरलेल्या प्रवाशाला सत्र न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जुलै २०१३ मध्ये घडलेल्या या प्रकरणात बेस्टचे वाहक (कंडक्टर) पंकज आगवणे यांनी आरोपी प्रवाशाला मागील दरवाजातून उतरण्यासाठी मनाई केली होती. तसेच नियमानुसार तुम्ही बसच्या पुढील दरवाजाने उतरा, असे सांगितले होते. मात्र यावरून संबंधित प्रवासी आणि कंडक्टरमध्ये वादावादी झाली. त्यातून आरोपीने वाहकाला मारहाण केली. याबाबत शाहूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कर्तव्यावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण, बेस्टच्या नियमांचे उल्लंघन अशा कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते. सेवेत आणि कामावर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करून अडसर निर्माण करण्याच्या आरोपात मारहाण करणारा आरोपी दोषी आहे, याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे या गंभीर गुन्ह्यासाठी शिक्षा आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. घटना घडली तेव्हा आरोपी २३ वर्षांचा होता. मात्र आता त्याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत. त्यामुळे त्याला चांगल्या वागणुकीच्या हमीवर मुक्त करण्याची मागणी आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आली. मात्र ही मागणी न्या. एस. डी. तवशीकर यांनी अमान्य केली. सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण हा गंभीर गुन्हा आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच आरोपीला २० हजार रुपये दंडही सुनावला आणि ही रक्कम वाहकाला देण्याचे आदेश दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08054 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..