विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता विद्यार्थीही सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात
आता विद्यार्थीही सहभागी
विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता विद्यार्थीही सहभागी

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आता विद्यार्थीही सहभागी

sakal_logo
By

मुंबई, ता. ९ : शुल्कवाढीविरोधात आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात आता प्राध्यापकही सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून उपोषणाच्या ठिकाणी थेट विविध विषयांवर वर्ग घेण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे २० दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला प्राध्यापकांच्या सहभागामुळे पाठबळ मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
आयआयटी मुंबई प्रशासनाने केलेल्या शुल्कवाढीविरोधात आंदोलक विद्यार्थ्यांनी तीन दिवसांपासून जिमखाना परिसरात उपोषणाला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या आंदोलनातील सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयआयटीतील अनेक प्राध्यापक पुढे आले आहेत. आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी उपोषण सुरू असलेल्या जिमखाना येथे जाऊन प्राध्यापकांनी विविध विषयाचे वर्ग घेण्यास पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ७) मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. अनिल सिंग यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचा पहिला वर्ग घेतला. या वर्गाला आंदोलक विद्यार्थ्यांसोबतच अन्य विद्यार्थ्यांनीही मोठा प्रतिसाद दिला. शुल्कवाढविरोधी आंदोलन आणखी लांबल्यास विविध विभागाचे प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेणार असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थ्‍यांच्या आंदोलनात आता प्राध्यापकही सहभागी झाल्याने आयआयटी प्रशासन लवकरच तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेईल, अशी चर्चा सुरू आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08062 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..