इंधनात इथेनॉलचे मिश्रण टाकल्‍याने ३० हजार कोटींची बचत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंधनात इथेनॉलचे मिश्रण टाकल्‍याने ३० हजार कोटींची बचत
इंधनात इथेनॉलचे मिश्रण टाकल्‍याने ३० हजार कोटींची बचत

इंधनात इथेनॉलचे मिश्रण टाकल्‍याने ३० हजार कोटींची बचत

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ ः इथेनॉलची कमतरता असलेल्या राज्यांमध्ये दरवर्षी ७५७ कोटी लिटर इथेनॉल निर्माण करणारे कारखाने भारत पेट्रोलियमतर्फे (बीपीसीएल) स्थापन केले जाणार आहेत. त्याद्वारे सन २०२५ पर्यंत इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे ध्येय गाठण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या प्रयत्नांमुळे दर वर्षी पेट्रोलवर होणाऱ्या खर्चात ३० हजार कोटी रुपये बचतीची अपेक्षा असल्याची माहिती बीपीसीएल रिटेलचे कार्यकारी संचालक पी. एस. रवी यांनी दिली.
बीपीसीएल ओरिसामध्ये दोन बायो इथेनॉल रिफायनरी स्थापन करीत आहे. त्यामुळे इथेनॉलची उत्पादनक्षमता दरवर्षी सहा कोटी लिटरने वाढेल. ज्या राज्यात अतिरिक्त इथेनॉल असेल, ते रेल्वेमार्गाने कमतरता असलेल्या राज्यांमध्ये पुरवले जाईल. दर वर्षी १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या वर्ल्ड बायोफ्युएल डेनिमित्त ही माहिती देण्यात आली. स्थानिक पातळीवर शेतमाल किंवा शेतीमधील टाकाऊ पदार्थांपासून तयार झालेल्या या पर्यायी इंधनामुळे देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, आयात कमी करण्यास, रोजगार निर्मिती करण्यास, कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती करण्यास तसेच पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होईल. सध्या भारत दर वर्षी ५५१ अब्ज डॉलरचे पेट्रोलियम पदार्थ आयात होतात, इथेनॉलमुळे ही आयात दर वर्षी किमान एक अब्ज डॉलरने म्हणजे तीस हजार कोटी रुपयांनी कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08072 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..