एसएनडीटी महिला विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसएनडीटी महिला विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शन
एसएनडीटी महिला विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शन

एसएनडीटी महिला विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शन

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ ः श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठात (एसएनडीटी) स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने स्वातंत्र्य चळवळ आणि प्राचीन भारताची ओळख सांगणारे तसेच विविध राजकीय, सामाजिक घडामोडी आदींचा उलगडा करणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. हे ग्रंथ प्रदर्शन विद्यापीठाच्या चर्चगेट संकुलाच्या आवारातील महर्षी कर्वे ज्ञानस्रोत केंद्रात भरवण्यात आले असून राज्य मानवी हक्क आयोगाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. रवींद्र शिसवे यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन झाले. १७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
ग्रंथ प्रदर्शनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. रुबी ओझा व विशेष उपस्थिती म्हणून ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण उपस्थित होते. या ग्रंथ प्रदर्शनामध्ये प्रामुख्याने भारताचा प्राचीन इतिहास ते आधुनिक भारत या संदर्भात ग्रंथ, स्त्रीविकास चळवळ, देशाच्या विकासामध्ये योगदान असलेल्या महान पुरुषांची चरित्र तसेच देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडणारे ग्रंथ असे एकूण ६०० ग्रंथ, लेख, मासिके आणि अनेक तक्ते यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठाच्या स्थापनेपासून ज्या महान व्यक्तींनी भेटी दिल्या त्या सर्वांचे फोटोही ठेवण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित ‘उत्सव आत्मनिर्भरतेचा’ अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. ते पुढील सात दिवस चालणार आहे. उत्सव आत्मनिर्भरतेचा या कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ प्रदर्शनाने झाली आहे.

विद्यापीठात ४ लाखांचा ग्रंथसाठा
भारतरत्न महर्षी कर्वे ज्ञान स्रोत केंद्रामध्ये एकूण ४ लाख ग्रंथ, ४०० नियतकालिके, १,५०,००० ई जर्नल, ५८ डेटाबेस एवढा समृद्ध साठा आहे. या केंद्रातर्फे विद्यार्थिनींना विविध प्रकारचे साहित्य, शैक्षणिक साहित्य, आदी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08077 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..