मेट्रो-३च्या खर्चसह कर्ज घेण्याला मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो-३च्या खर्चसह कर्ज घेण्याला मान्यता
मेट्रो-३च्या खर्चसह कर्ज घेण्याला मान्यता

मेट्रो-३च्या खर्चसह कर्ज घेण्याला मान्यता

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या सुधारित खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी प्रकल्पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी रुपये होता. हा खर्च आता ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाखांवर पोहोचला आहे. त्यातच सुधारित वित्तीय आराखड्यानुसार जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेकडून (जायका) वाढीव रकमेचे कर्ज घेण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत मेट्रो-३ च्या सुधारित खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. सुधारित आराखड्यानुसार राज्य सरकारच्या हिश्श्याची रक्कम दोन हजार ४०२ कोटी ७ लाख रुपयांवरून तीन हजार ६९९ कोटी ८१ लाख रुपयांवर गेली आहे. त्यामुळे राज्याच्या समभागापोटी एक हजार २९७ कोटी ७४ लाख अशी वाढीव रक्कम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई मेट्रो रेलला देण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तसेच जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेचे कर्ज १३ हजार २३५ कोटींवरून १९ हजार ९२४ कोटी ३४ लाख इतके झाले आहे. हे वाढीव रकमेचे कर्ज घेण्यासदेखील मान्यता देण्यात आली.

भूसंपादन पूर्ण
मेट्रो मार्ग ३ ची एकूण लांबी ३३.५ किलोमीटर असून, हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील, असा अंदाज आहे. या मार्गातील बोगद्यांचे ९८.६ टक्के काम झाले असून, भूमिगत स्थानकांचे सुमारे ८२.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी ७३.१४ हेक्टर सरकारी जमीन व २.५६ हेक्टर खासगी जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08078 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..