एल्गारप्रकरणी आता मनी लॉण्डरिंगचा तपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एल्गारप्रकरणी आता
मनी लॉण्डरिंगचा तपास
एल्गारप्रकरणी आता मनी लॉण्डरिंगचा तपास

एल्गारप्रकरणी आता मनी लॉण्डरिंगचा तपास

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : एल्गार परिषद प्रकरणात आता राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) मनी लॉण्डरिंगबाबत तपास करणार आहे. विशेष न्यायालयाने आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांची चौकशी करण्याची परवानगी एनआयएला दिली आहे.
गडलिंग सध्या तळोजा कारागृहात आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात मनी लॉण्डरिंग झाल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळे एल्गार परिषदेत झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी एनआयए कायद्याच्या कलम ५०(२) नुसार चौकशी करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता. विशेष न्या. राजेश कटारिया यांनी आज हा अर्ज मंजूर केला. यानुसार १७ ते १९ ऑगस्टदरम्यान ही चौकशी करण्याची मुभा न्यायालयाने दिली.
एनआयएने गतवर्षी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. गडलिंग हे नागपूर येथील वकील असून सन २०१८ पासून अटकेत आहेत. चार वर्षांनंतर आता एनआयए यामध्ये तपास करू शकत नाही, असा दावा गडलिंग यांनी केला होता. आरोपींनी मनी लॉण्डरिंगद्वारे बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांना आर्थिक सहाय्य केल्याचा आरोप तपास यंत्रणेने ठेवला आहे. याबाबत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08083 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..