७१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

७१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले
७१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले

७१ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या एक लाख ३९ हजार ६६५ पैकी तब्बल ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी कोणताच प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती समोर आली आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ३ ऑगस्टला जाहीर झाली होती. त्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याची मुभा नुकताच संपली, त्यामध्ये ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रवेश फेरीतील अनेक पसंतीक्रमात मिळालेले प्रवेश नाकारले. पहिल्या पसंती क्रमामध्ये १२ हजार २१९, दुसऱ्या पसंती क्रमात १२ हजार ६९७ आणि तिसऱ्या पसंती क्रमात १० हजार ७९६ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हे विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी शिक्षण विभागाची मोठे डोकेदुखी ठरण्याची शक्यता शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

आज दुसरी गुणवत्ता यादी
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील दुसरी गुणवत्ता यादी ११ ऑगस्टला जाहीर होणार आहे. या गुणवत्ता यादीत ज्यानी आपले पसंतीक्रम नोंदवले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जाणार आहे; तर पहिल्या गुणवत्ता यादीत ज्यांनी प्रवेशासाठी कोणताही प्रतिसाद नोंदवला नाही, अशा विद्यार्थ्यांना मात्र यादीमध्ये कोणतेही स्थान असणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08085 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..