ग्रंथ प्रदर्शनात संविधानाची मूळ प्रत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रंथ प्रदर्शनात संविधानाची मूळ प्रत
ग्रंथ प्रदर्शनात संविधानाची मूळ प्रत

ग्रंथ प्रदर्शनात संविधानाची मूळ प्रत

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक वारशाचे साक्षीदार होण्याचा संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात आयोजित प्रदर्शनात भारतीय संविधानाची मूळ प्रत आकर्षण असेल. त्यासोबतच इतर अनेक दुर्मिळ ग्रंथ, स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेले स्वातंत्र्यसैनिक, शहीद आदींची छायाचित्रे, भारतीय इतिहास, भारतीय संस्कृती आणि गड-किल्ल्यांची माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत स्वराज्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील प्रदर्शनाचे उद्‍घाटन दार्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ग्रंथपाल गट (अ)चे संचालक संजय बनसोड यांच्यासह राज्य मध्यवर्ती ग्रंथालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भारतीय संविधानाची एक मूळ प्रत राज्य मध्यवर्ती ग्रंथालयात संग्रहित असून ती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. त्यासोबतच शहीद भगतसिंग, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह संत तुकाराम, यशवंतराव चव्हाण यांच्यावरील अनेक ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. भारताची आणि राज्याची माहिती देणारी महत्त्वाची पुस्तके आणि गड-किल्ल्यांची छायाचित्रेही प्रदर्शनात मांडण्यात आली असून तेही मोठे आकर्षण ठरले असल्याचे बनसोड यांनी सांगितले.

आज ग्रंथदिंडी
स्वराज्य महोत्सव साजरा करण्यासाठी राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यात वाचन संस्कृती आणि त्याची आवड निर्माण व्हावी हा मूळ उद्देश ठेवण्यात आला असून ‘हर घर तिरंगा’चाही संदेश दिला जाणार आहे. दिंडीत ढोल-ताशा आणि लेझीम पथकासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील चित्ररथ काढण्यात येणार आहेत. त्यात विविध धर्मपंथांची वेशभूषा धारण केलेले विद्यार्थी सहभागी होतील. भजनाचा गजर करण्यासाठी वारकरीही सहभागी होणार असल्याची माहिती ग्रंथपाल संजय बनसोड यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08098 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..