पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेशास नकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पसंतीचे महाविद्यालय 
मिळूनही प्रवेशास नकार
पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेशास नकार

पसंतीचे महाविद्यालय मिळूनही प्रवेशास नकार

sakal_logo
By

संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित होऊनही तब्बल १२ हजार २९९ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश नाकारले आहेत. विद्यार्थ्यांकडून प्रवेश नाकारण्यामागे काही तरी काळेबेरे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर प्रवेश प्रक्रियेदरम्यान शिक्षण विभागाकडून ‘वॉच’ ठेवला जाणार आहे. प्रसंगी प्रवेश मिळूनही जाणीवपूर्वक प्रवेश मिळत नाही, असा कांगावा करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी ३ ऑगस्टला जाहीर झाली. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील एक हजार १५ कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध जागांपैकी एक लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यात पहिल्या पसंतीची महाविद्यालये ६१ हजार ७३५ विद्यार्थ्यांना मिळाली होती. त्यापैकी ४९ हजार ४३६ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले, तर ८० जणांनी रीतसर प्रवेश रद्द केले; मात्र उर्वरित तब्बल १२ हजार २९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित होऊनही प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे प्रवेश निश्चित होऊनही विद्यार्थ्यांनी प्रवेश का घेतले नाही, याविषयी शिक्षण विभाागाकडून माहिती घेतली जात आहे. पुढील काळात बेकायदेशीर मार्गाने किंवा विशेष फेरीऐवजी गैरप्रकारे प्रथम प्राधान्य फेरीचा आग्रह धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ते कोणत्या प्रवेश फेरीत आणि कोणत्या महाविद्यालयांची पसंती दर्शवतात, याचीही माहिती गोळा केली जाणार आहे.
--
गतवर्षीही झाला होता गैरप्रकार
गतवर्षी झालेल्या प्रवेश प्रक्रियेत बेकायदा प्रथम प्राधान्य फेरी ही सात टप्प्यांत राबवली होती. त्यात विशिष्ट महाविद्यालयांमध्येच मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले होते. तोच प्रकार यंदाही होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय लागल्यानंतरही प्रवेश घेतले नसल्याचे शिक्षण तज्ज्ञांना वाटते.
--
विशेष फेरी आवश्यक
अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मागील वर्षांत झालेल्या गैरप्रकाराची यंदा पुनरावृत्ती रोखण्यासाठी मुख्य प्रवेश फेऱ्यानंतर केवळ विशेष फेऱ्या घेतल्या जाव्यात आणि कमीत कमी फेऱ्यांचे नियोजन केले जावे. त्यासाठी शिक्षण विभागाने कठोर भूमिका घ्यावी. जेणेकरून गुणवंत विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळेल, असेही तज्ज्ञांना वाटते.
--
काही महाविद्यालयांमध्ये पसंतीचे विषय नसल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या तक्रारीही आल्या आहेत; मात्र ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीत प्रवेश घेतले नाहीत, त्यांना दुसऱ्या फेरीत प्रवेश प्रक्रियेतून दूर ठेवले जाईल.
- महेश पालकर, शिक्षण संचालक
---
अकरावीची प्रवेशसंख्या
पसंतीक्रम ॲलोटमेंट प्रवेश‍ित प्रवेश नाकारलेले
१ ६१७३५ ४९४३६ १२२९९
२ २१६९० ८९३५ १२७५५
३ १४४७६ ३६४४ १०८३२
४ ११५१९ २२१३ ९३०६
५ ९०२३ १४१० ७६१३
६ ६७११ ६७११ ८६२
७ ५२०६ ५९५ ४६११
८ ३९३८ ४०१ ३५३७
९ २९०८ २९१ २६१७
१० २४४५ १८७ २२५८
एकूण १३९६५१ ६७९६३ ७१६८९

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08102 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..