रिक्त पदांविरोधात प्राध्यापक संघटना आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्त पदांविरोधात प्राध्यापक संघटना आक्रमक
रिक्त पदांविरोधात प्राध्यापक संघटना आक्रमक

रिक्त पदांविरोधात प्राध्यापक संघटना आक्रमक

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : राज्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असून, सरकारकडून याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ प्राध्यापक संघटनांनी आता सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. सरकारने २२ ऑगस्टपर्यंत प्राध्यापकांच्या रिक्त जागांसोबत अंशकालीन (पार्टटाईम) तत्त्वावर कार्यरत प्राध्यापकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा ‘बुक्टो’ संघटनेने दिला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या आवारातून या आंदोलनाची सुरुवात केली जाईल, असे प्राध्यापकांच्या ‘बुक्टो’ या संघटनेने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ‘समान काम समान वेतन’ची अंमलबजावणी प्राध्यापकांच्या संदर्भात लागू करावी, ‘करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम’मध्ये अनेक त्रुटी दाखवून त्यासाठीची वसुली राज्यभरातील प्राध्यापकांकडून केली जात असून ती तात्काळ थांबवण्यात यावी, एम.फिल.पात्र प्राध्यापकांनाही सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, जुन्या पेन्शन योजनेसोबत पात्र कंत्राटी, सीएचबी शिक्षकांना रिक्त पदांवर सामावून घेणे आदी मागण्या संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08147 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..