शाळा महाविद्यालयांमध्ये जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा महाविद्यालयांमध्ये जल्लोष
शाळा महाविद्यालयांमध्ये जल्लोष

शाळा महाविद्यालयांमध्ये जल्लोष

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने घरोघरी तिरंगा हा कार्यक्रम आज मुंबईसह राज्यातील विद्यापीठे, शाळा, महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या तिरंगा पदयात्रा, रॅलीचा जल्लोष दिसून आला. गणवेशासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
मुंबई विद्यापीठातील ३२० फूट तिरंगा पदयात्रेसह विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या ३५० हून अधिक महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेतील तब्बल ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा त्यात मोठा सहभाग होते. यात तिरंगा रॅली, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगणारे पथनाट्य, सामूहिक राष्ट्रगीत, रांगोळी प्रदर्शन, भित्तीचित्रांचे प्रदर्शन यांचा समावेश होता. मुंबईच्या विविध १२ हून अधिक रेल्वे स्थानकांवर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ८८७ बॉटल रक्त संकलन करण्यात आले असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाच्या एनएसएसचे विशेष कार्यकारी अधिकारी सुशील शिंदे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08149 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..