रुग्णसेवेबरोबरच दहीहंडी फोडण्याचा सराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णसेवेबरोबरच दहीहंडी फोडण्याचा सराव
रुग्णसेवेबरोबरच दहीहंडी फोडण्याचा सराव

रुग्णसेवेबरोबरच दहीहंडी फोडण्याचा सराव

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ : दहीहंडी उत्सव काही दिवसांवर आल्याने गोविंदा पथकाचा सराव जोरात सुरू आहे. जे. जे. रुग्णालयातील कर्मचारीही यंदा थरावर थर रचणार असून रुग्णसेवा पूर्ण झाल्यानंतर दहीहंडी फोडण्याचा त्यांचा सराव रंगत आहे. निवृत्त कर्मचारीही जे. जे. रुग्णालयातील गोविंदा पथकात सहभागी झाल्याने त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईबरोबरच ठाण्यातील उत्सवात सात ते आठ थर रचण्यासाठी त्यांची जोरात तयारी सुरू आहे.

जे. जे. रुग्णालयातील कर्मचारी वर्गाचे ‘नवयुग गोविंदा पथक’ मोठ्या हिरिरीने सरावात रमले आहे. रुग्णसेवा करून मिळणाऱ्या वेळेत ते दहीहंडीचा सराव करत असतात. रुग्णालयाचे जे कर्मचारी सेवानिवृत होऊन बाहेर राहायला गेले आहेत, ते आणि त्यांची मुलेही कर्मचारी वसाहतीत सरावासाठी येत आहेत. नवयुग गोविंदा पथक २० ते २५ वर्षांपासून जे. जे. रुग्णालयातून मुंबई उपनगर आणि ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी जात आहे. जे. जे. रुग्णालयाचे नाव उंचावण्यासाठी सर्व कर्मचारी व त्यांची मुले सरावात मेहनत घेत आहेत. यंदा सात ते आठ थर लावण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी पथकाचे मास्तर सुरेश तांबे, प्रमोद पाताडे व अनिल शेलार रोज रात्री ९ ते ११ दरम्यान सराव घेत असतात. पथकाला जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ. संजय सुरासे व सर्व अधिकारी वर्गाचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याची माहिती तृतीय श्रेणी संघटनेचे अध्यक्ष व मास्तर सुरेश तांबे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08156 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..