शाळा महाविद्यालयात झाला स्वातंत्र्य दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा महाविद्यालयात झाला स्वातंत्र्य दिन साजरा
शाळा महाविद्यालयात झाला स्वातंत्र्य दिन साजरा

शाळा महाविद्यालयात झाला स्वातंत्र्य दिन साजरा

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने मुंबई आणि परिसरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वातत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळी ध्वजवंदनासह ठिकठिकाणी प्रभात फेरी आणि तिरंगा रॅली काढण्यात आल्या होत्या; तर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांनी रांगोळी काढून सर्व परिसर तिरंग्याने सजवल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मुंबई विद्यापीठासह एसएनडीटी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये घरोघरी तिरंगाअंतर्गत कार्यक्रम सादर करण्यात आले. यात राष्ट्रीय सेवा योजनेचे शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते; तर दोन्हीही विद्यापीठांत सुरू करण्यात आलेल्या आणि स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तक प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
मुंबई महापालिका शिक्षण विभागामार्फत करी रोड येथील त्रिवेणी संगम मुंबई पब्लिक स्कूल या शालेय इमारतीमधील शिक्षण विभागाच्या मुख्यालयात शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ आणि महानगरपालिकेतील गुणवंत शिक्षक विनोद पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी बँड व बासरी वादन, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले; तर महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रभात फेऱ्या, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, वेशभूषा, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या वेळी शिक्षणाधिकारी कंकाळ यांनी अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्यांच्या प्राणाचे बलिदान देऊन मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवावे, तसेच विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करून यशस्वी होऊन देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावण्याचे आवाहन केले; तर खासगी अनुदानित शाळांमध्येही मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यदिनाने कार्यक्रम साजरे करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08176 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..