मेट्रो- ३ चाचणीसाठी सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो- ३ चाचणीसाठी सज्ज
मेट्रो- ३ चाचणीसाठी सज्ज

मेट्रो- ३ चाचणीसाठी सज्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो-३’चे डबे आरेमध्ये दाखल झाले असून त्यांची जुळवणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) डब्यांचे उच्च दाबाने चार्जिंग सुरू केले आहे. त्यामुळे मेट्रो ३ मार्गावर या महिन्याच्या अखेरीपासून चाचण्या सुरू करण्याचे नियोजन ‘एमएमआरसीएल’ने केले आहे.
मेट्रो ३ च्या कारशेड उभारण्यास आरेमध्ये वेग आला आहे. आरेतील कारशेडला पर्यावरण संघटनांकडून विरोध होत असतानाही मेट्रोच्या चाचणीची तयारी ‘एमएमआरसीएल’ने सुरू केली आहे. त्यासाठी मेट्रोचे डबे आंध्र प्रदेशातील श्रीसिटीहून मुंबईपर्यंत आणण्यात आले आहेत. या डब्यांची यशस्वीपणे जुळवणी करण्यात आली आहे. हे काम पूर्ण होताच एमएमआरसीएलने आठ डब्यांचे उच्च दाबाने चार्जिंग सुरू केले आहे. २५ केव्ही-एसी इतक्या उच्च दाबाने ट्रेनचे डबे चार्ज केल्यामुळे मेट्रोतील वातानुकूलित यंत्रे, संवाद प्रणाली, विद्युत यंत्रणा चालवण्यास मदत होईल. यानंतर मेट्रोच्या चाचण्या घेण्यास प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे एमएमआरसीएलच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08186 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..