दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत
दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत

दुसऱ्या फेरीसाठी आज अखेरची मुदत

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांना आपले प्रवेश पूर्ण करण्यासाठी बुधवारी (ता. १७) सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेवटची मुदत आहे. या मुदतीतच विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. दरम्यान, दोन्ही फेरीनंतर केवळ २१.६२ टक्के प्रवेश घेतल्याने यंदाही हजारो जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
मुंबईसह राज्यातील पाच महापालिका क्षेत्रात अकरावीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेत ३ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरक्षेत्रात पहिली प्रवेश फेरी जाहीर करण्यात आली होती. या प्रवेश फेरीदरम्यान एक लाख ३९ हजार ६५१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यापैकी तब्बल ७१ हजार ४२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले, तर दुसरी प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी ही १२ ऑगस्ट रेाजी जाहीर झाली होती. त्या दुसऱ्या फेरीच्या प्रवेशासाठी १ लाख ६५ हजार ७११ विद्यार्थ्यांपैकी ६९ हजार ६९१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते, या दोन्ही प्रवेश फेरीदरम्यान आत्तापर्यंत केवळ २१.६२ टक्केच विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले आहेत. त्यामुळे दुसऱ्या प्रवेश फेरीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर हजारो जागा पुन्हा रिक्त राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---
द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाला प्राधान्य
दरम्यान, आपल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश आणि बायफोकल (द्व‍िलक्ष्यी) विषय मिळण्याची खात्री असेल तरच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्याकडे कल दिसतो, त्यामुळे दुसऱ्या प्रवेश फेरीतही प्रवेश कमी झाल्यास त्याचे परिणाम हे तिसऱ्या गुणवत्ता यादीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08188 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..