आशिष बुक सेंटरच्या प्रदर्शनात इंग्रजी शाळेतील पालकांकडून मराठी पुस्तकांची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आशिष बुक सेंटरच्या प्रदर्शनात इंग्रजी शाळेतील पालकांकडून मराठी पुस्तकांची मागणी
आशिष बुक सेंटरच्या प्रदर्शनात इंग्रजी शाळेतील पालकांकडून मराठी पुस्तकांची मागणी

आशिष बुक सेंटरच्या प्रदर्शनात इंग्रजी शाळेतील पालकांकडून मराठी पुस्तकांची मागणी

sakal_logo
By

इंग्रजी शाळेतील पालकांना मराठी पुस्तकांचे वेड
चर्चगेटमधील बुक सेंटरच्या प्रदर्शनात कथा-कादंबऱ्यांना पसंती
मुंबई, ता. १७ : चर्चगेटमधील सुंदरबाई हॉलमध्ये भरलेल्या प्रदर्शनामध्ये इंग्रजी शाळेतील पालकांकडून मराठी विषयांच्या पुस्तकांना चांगलीच पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. त्यातही मराठी कथा-कादंबरीबरोबरच विविध गोष्टींच्या पुस्तकांचा शोध पालक घेत आहेत. पालक मोठ्या प्रमाणात मराठीतील पुस्तके खरेदी करत असल्याची माहिती प्रदर्शनाच्या आयोजकांनी दिली.
आशीष बुक सेंटरचे यंदाच्या वर्षीचे पहिले प्रदर्शन सुंदरबाई हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आदी भाषांतील तब्बल एक लाखांहून अधिक पुस्तके मांडण्यात आली आहेत. कोरोनानंतर सुरू झालेल्या प्रदर्शनाला तरुण, विद्यार्थी, पुस्तकप्रेमी, शाळांतील शिक्षक, प्राध्यापक आणि वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ११ हजारांच्या आसपास पुस्तकांची विक्री झाल्याची माहिती आशीष बुक सेंटरचे धवल निसर यांनी दिली. पुस्तक प्रदर्शन १९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे; परंतु मोठ्या प्रमाणात पुस्तकांची मागणी वाढल्याने अनेक ग्राहकांकडून मुदत वाढवण्याची सूचना केली जात आहे.
प्रदर्शनातील पुस्तकांवर २० ते ८५ टक्के सवलत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मुलांच्या पुस्तकांची सर्वाधिक मागणी आहे. कोणतेही पुस्तक शंभर रुपयांना, अशी आॅफरही आहे. सर्वाधिक पुस्तके इंग्रजीची असून त्यात कथा, कादंबरी, नाटके, विविध प्रकारचे साहित्य आदींचा समावेश आहे. श्रीमद्‍भागवत १२ स्कंदचे १८ ग्रंथ, पेरियार रामास्वामी यांचे सच्ची रामायण आणि जॉर्ज ऑरवेल यांची ॲनिमल फार्म व १९८४ इत्यादी पुस्तके लक्ष वेधतात. १० हजारांचे वर्ल्ड बुक अर्ध्या किमतीत म्हणजेच ५ हजार रुपयांना उपलब्ध आहे. अशी पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचकांची मोठी पसंती मिळत असल्याचे सांगण्यात आले.

वाचक खूश
‘एकाच प्रदर्शनामध्ये मुलांना आणि आम्हाला आवश्यक असलेली कथा-कादंबऱ्यांपासून विविध प्रकारच्या विषयांवरील पुस्तके आमच्या बजेटमध्ये मिळत आहे. त्यामुळे मुलांसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली,’ असे पुस्तकप्रेमी आणि ग्राहक अंजली देठिया म्हणाल्या. ‘माझ्या मुलाला हवी असलेली पुस्तके इथे मिळाली. त्याने आपल्या पसंतीने अनेक पुस्तके चाळली आणि खरेदी केली. सर्वाधिक इंग्रजी पुस्तके खरेदी केली,’ असे अरवा यांनी सांगितले. चांगल्या लेखकाची असंख्य पुस्तके आम्हाला एकाच ठिकाणी मिळाली. इंग्रजी, हिंदी आणि मराठी विषयांची पुस्तके खरेदी केली. गोष्टीच्या पुस्तकांना अधिक पसंती होती, असे कांचन छेडा यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08199 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..