पूर्व मुक्त मार्ग कोस्टल रोडला जोडणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्व मुक्त मार्ग कोस्टल रोडला जोडणार ?
पूर्व मुक्त मार्ग कोस्टल रोडला जोडणार ?

पूर्व मुक्त मार्ग कोस्टल रोडला जोडणार ?

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पूर्व मुक्त मार्ग ते कोस्टल रोड आणि मरीन ड्राईव्ह असा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. या प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) आणि व्यवस्थापन सल्लागार नेमणुकीसाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. हा प्रकल्प व्यवहार्य ठरल्यास मुंबई शहर आणि उपनगरांमधील वाहतूक कोंडी फुटण्याची शक्यता आहे.

अत्यंत वर्दळीचे दाटीवाटीने वसलेल्या आणि व्यापार, प्रशासकीय कार्यालयांचे केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईमध्ये नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. ही कोंडी फोडण्यासाठी एमएमआरडीएने दक्षिण मुंबई ते पूर्व उपनगराला जोडणारा पूर्व मुक्त मार्ग उभारला. या मार्गामुळे नवी मुंबईहून दक्षिण मुंबईत येणाऱ्या वाहनांचा प्रवास वेगवान झाला आहे. तसेच दक्षिण मुंबई ते नवी मुंबईला जोडण्यासाठी मुंबई पारबंदर मार्ग प्रकल्प एमएमआरडीएमार्फत राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य एमएमआरडीए प्रशासनाने ठेवले आहे. यासोबतच शिवडी वरळी जोडणी उड्डाणपुलाचे कामही एमएमआरडीएने हाती घेतले आहे. हे प्रकल्प पुढील वर्षी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

कोस्टल रोडसाठी २ सप्टेंबरपर्यंत निविदांची मुदत
मुंबई शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोडचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरात जाण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. पूर्व मुक्त मार्ग थेट कोस्टल रोडला जोडण्यासाठी एमएमआरडीएने हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी एमएमआरडीएने तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प सुमारे ३.६५ किलोमीटरचा असणार आहे. पात्र कंपन्यांना २ सप्टेंबरपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत.

वाहतूक कोंडी फुटणार
मानखुर्द येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुंबईतील पी डेमेलो, कर्नाक बंदर असा सुमारे २० किमीचा इस्टर्न फ्री वे आहे. या मार्गावरून दररोज हजारो वाहने येतात. या मार्गामुळे पूर्व उपनगर मुंबई शहर जोडण्यात आले आहे. या मार्गावरून येणारी वाहने पश्चिम उपनगरात किंवा मंत्रालय, कुलाबा, नरिमन पॉइंट या परिसरात जाण्यासाठी फोर्ट विभागातील रस्त्यांवरून जातात. यामुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे इस्टर्न फ्री वे कोस्टल रोडला जोडण्याचा विचार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08200 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..